Description
अनुसूचित जातीच्या समाजाचे लोक समुहाने गावाच्या परिसीमेत वास्तव्य करीत राहतात. तसेच
बऱ्याचदा अनुसूचित जातींपैकी उपजातीनिहाय घरे वेगवेगळ्या समुहाने एकत्रित वास्तव्य करुन राहतात
व अशा प्रकारे वास्तव्य करुन असलेल्या सर्व जाती/उपजाती यांच्या वस्तीस दलित वस्ती असे
संबोधण्यात येते. या वस्त्यांमध्ये मुलभुत सोयीसुविधा पुरवून तेथील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी
दलित वस्ती सुधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत दलित वस्त्यांमध्ये
अंतर्गत रस्ते, नाली बांधणे, पाणीपुरवठा, पाण्याचा हौद, समाजमंदीर, रस्त्यावरील विद्युत पुरवठा,
शौचालये इ. गरजा विचारात घेऊन सदर नागरी सुविधांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी दिली
जाते. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे (ग्रामिण) (पूर्वीचे नाव दलित वस्ती) असे करण्यात आले आहे.
Reviews
There are no reviews yet.