मित्रांनो, आपणास आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी किंवा मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा इतर कामासाठी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्राची गरज असते. विवाह झाल्यानतर आपणाला विवाह नोंदणी निबंधाकडे अर्ज करावा लागतो. हि नोंदणी ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका येथे केली जाते. यासाठी तुम्हाला अर्जासोबत काही कागदपत्रे सादर करावी लागतात. हि कागदपत्रे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनिअम 1998 नुसार वधू किंवा वर हे ज्या गावातील रहिवाशी आहेत त्या पैकी कोणत्याही एकाच विवाह निबंधकाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- विवाह नोंदणी फॉर्म – ( नमून नं. – ड )- ग्रामपंचायत कडे मोफत उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- विवाह नोंदणी विवाह झाल्यापासून 90 दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे.
- वधु आणि वर यांच्या वयाचा पुरावा – यामध्ये खालील पैकी कोणतेही एक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- टी. सी. ( शाळा सोडल्याचा दाखला )
- प्रवेश निर्गम उतारा
- जन्माचा दाखला
- 10 वी / 12 वी चे प्रमाणपत्र ( सनद )
- वाहन परवाना
- पासपोर्ट
- वधू आणि वर यांचे पासपोर्ट साईज फोटो – दिनांकासह
- वधु व वर यांचा विवाह प्रसंगाचा फोटो (4 x 6)
- तीन साक्षीदार, तिन्हीही साक्षीदारांचे 02 पासपोर्ट साईज फोटो – दिनांकासह
- वर आणि तीन साक्षीदार यांच्या राहण्याचा पुरावा – ( कोणतेही एक सांक्षाकीत झेरॉक्स )
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- लाईट बिल / फोन बिल
- शासकीय ओळखपत्र
- वाहन परवाना
- पासपोर्ट
- राशन कार्ड
- डॉमेसाईल प्रमाणपत्र
- वधूचा विवाह पूर्वीचा राहण्याचा पुरावा – ( कोणतेही एक सांक्षाकीत झेरॉक्स )
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- लाईट बिल / फोन बिल
- शासकीय ओळखपत्र
- वाहन परवाना
- पासपोर्ट
- राशन कार्ड
- डॉमेसाईल प्रमाणपत्र
- मूळ लग्नपत्रिका ( मुल लग्न पत्रिका नसेल तर विहित नमुन्यात १०० /- रु. च्या नोटराईज बॉंड पेपर वर शपथपत्र )
- विवाहची नोंदणी या पूर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्याबाबत विहित नमुन्यात १०० /- रु. च्या नोटराईज बॉंड पेपर वर शपथपत्र
- अर्जासह जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळप्रती नोंदणीच्या वेळी पडताळणी करतेवेळी सादर करणे आवश्यक आहे.
- वधू, वर आणि तीन साक्षीदार यांनी विवाह निबंधकासमोर विवाह निबंधक कार्यालयात हजर राहून सही / अंगुठा करणे आवश्यक आहे.
- मुस्लीम व्यक्तीच्या विवाह कायद्यानुसार विवाह झाला असेल तर निकाहनाम्याची स्व: सांक्षाकीत झेरॉक्स प्रत जोडावी.
- पक्षकार घटस्पोटीत असल्यास कोर्टाचा आदेश प्रत आवश्यक
- विधवा / विधुर असल्यास मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक
- महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनिअम 1998 नुसार अंतरजातीय विवाहाची नोंद केली जात नाही.
- ज्या विवाहमध्ये वधू – वर किंवा यापैकी कोणीही अज्ञान असल्यास अशा विवाहाची नोंदणी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 1929 च्या कलम 06(01) नुसार स्थानिक पोलीस प्रशासनाच्या योग्य कार्यवाही नंतरच नोंदणी करता येईल.