Description
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश हा ग्रामीण भागातील व्यक्तीना अकुशल कामाची मागणी केल्यावर कामे उपलब्ध करून देणे व त्याद्वारे कायम स्वरूपी मत्ता निर्माण करणे हा आहे. तसेच शासन निर्णय क्र.मग्रारो-२०१६/प्र.क्र.६१/मग्रारो-१,दि.१२/०४/२०१८ व शासन निर्णय क्र.मग्रारो- २०११/प्र.क्र.१२०/रोहयो-१०अ, दि.१४/०३/२०१२ अन्वये वैयक्तीक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतक-याच्या शेत जमिनीवर फळबाग / वृक्ष लागवड कार्यक्रम राबविनेबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने या योजने अंतर्गत फळबाग / वृक्षलागवड करू शकता.
Reviews
There are no reviews yet.